जळगावसामाजिक

संत नरहरी महाराज सोनार पालखी सोहळा संपन्न

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ९ फेब्रुवारी २०२६ :  संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था जळगाव चे वतीने आयोजित संत नरहरी महाराज यांचा ७४० वा पुण्यतिथी महोत्सव नुकताच मेहरूण परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर या ठिकाणी प्रारंभी पालखी पूजन माजी महापौर सीमाताई भोळे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सोनार समाज वंशवाळकार ललित महाराज अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी रंजना वानखेडे. प्रशांत नाईक, विजय वानखेडे, रमेश वाघ ,जिवन सोनार, जगदिश देवरे, संजय विसपुते, राजेश बिरारी,यशवंत वडनेरे, सुनील सोनार,राजेंद्र रणधीर, ईश्वर सोनार यांचे हस्ते आरती व श्रीफळ फोडून टाळमृदंग, भजनी मंडळ,जय नरहरी च्या जयघोषात पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. 

महाराजांची प्रतिमा असलेला नरहरी रथ, भजनी मंडळ, पालखी महिला मंडळ व भाविक अशा दिमाखदार सोहळ्यात पालखी मार्गक्रमण करीत होत्या रस्त्यामध्ये रांगोळी काढण्यात येत होती तसेच ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी व आरती करण्यात येत होती.त्यामुळे संपूर्ण परिसर हा भक्ती भावात न्हाऊन निघाला.गणपती मंदिर विश्वकर्मा नगर या ठिकाणी पालखी सोहळा सांगता समारोह झाला. सदर कार्यक्रमास यावेळी सोनार समाज वंशवाळकार ललित महाराज ,नवनिर्वाचित महापौर दिपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक रंजना वानखेडे, निकिता वंजारी, उमेश सोनवणे,विजय वानखेडे, अध्यक्ष रमेश वाघ, उपाध्यक्ष जिवन सोनार सचिव जगदिश देवरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.स्वागत गीत भाग्यश्री व स्वरा बिरारी यांनी म्हटले सर्व मान्यवरांनी संत नरहरी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.संस्थेच्या वतीने मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच सुवर्णकन्या भाग्यश्री दुसाने हिने पंतप्रधान सायकल दौड पुणे ते दिल्ली हा प्रवास आपल्या टीम सह पूर्ण केल्याबद्दल तिचा सातकर समाजाच्या वतीने प्रमुख मान्यवरांनी संयुक्त रित्या करण्यात आला.तसेच राजेंद्र रणधीर व ईश्वर सोनार यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आलेबद्द्ल त्यांचा सत्कार करण्यात आला.. प्रास्तविक सचिव जगदिश देवरे यांनी केले तसेच मागील बारा वर्षापासून संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगत व्यक्त करून संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतुक केले व भविष्यात संस्थेमार्फत येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभाग, मार्गदर्शन व मदत करण्याचे आश्वासन दिले.महाआरती,पुष्पवृष्टी करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास किरण पातोंडेकर, राजेंद्र अहिरराव,भगवान सोनार, सुनील बिरारी,अरविंद दुसाने, शांताराम विसपुते, शाम पाटील,प्रशांत पिंगळे, विजय सोनार, उत्तमराव नेरकर, किशोर वडनेरे, राजेंद्र दुसाने, सुमित सोनार,राजेंद्र भामरे,दिपक दुसाने, वाघेश्वरी महिला मंडळ सदस्य.मीना वाघ, निर्मला देवरे, गिता सोनार, प्रमिला चव्हाण, दिपली बिरारी , सुनिता देवरे, सुनिता पिंगळे ,ज्योती सोनार,मनीषा अहिरराव, मनीषा वडनेरे,डिंपल बिरारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी.एस.पिंगळे,नितीन बिरारी,प्रमोद सोनार ,हर्शल बिरारी,गणेश देवरे, निलेश अहिरराव, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.सूत्र संचालन केतन सोनार यांनी केले.   

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button