जळगावधार्मिक

आदर्श जीवनाचे मार्गदर्शक भगवान शिव

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २४ मार्च २०२५ |

शिव ही अनादी देवता असून विश्वाची उत्पत्ती ब्रह्मदेवांनी केली विश्वाचे संगोपन विष्णू परमात्म्याने केले आणि विश्वाचे संतुलन भगवान शिव करतात. शिवभक्ती करत असताना तीर्थयात्रेचे खूप महत्त्व आहे.तीर्थ हे मनुष्याला सदाचारी जीवन देतात.
सत्य ,दया ,दान आणि तप ही धर्माची लक्षण असून कलियुगात दानाचे महत्त्व खूप आहे, जो तो आपल्या आपल्या पद्धतीने दानधर्म करतो.
श्री शिव महापुराण हे जीवन जगण्यासाठी चे सुंदर शास्त्र आहे भगवान शिवांच्या तत्वाने जीवनात वागणारा सामान्य मनुष्य देखील असामान्य कामगिरी करू शकतो.
असे प्रतिपादन ह भ प देवदत्त महाराज यांनी कथेतून केले.

श्री शिव महापुराण कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन पवन कोळी व युवा दशरथ नगर मित्र मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

कथेतून सामाजिक बांधिलकी जरूर जपावी
दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर देवकार्य धर्मकार्य राष्ट्र कार्य आणि समाजकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य असून*
सामाजिक जीवन जगत असताना समाजाची सेवा करणे हे सुद्धा खूप मोठे पुण्य आहे याचाच एक भाग म्हणून रक्तदान हे सुद्धा श्रेष्ठ दान आहे रक्तदान आयुष्यात नक्की करावे. उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी असे आवाहन कथेतून ह भ प देवदत्त महाराज यांच्यामार्फत करण्यात आले.
दशरथ नगर येथे युवा दशरथ नगर मित्र मंडळ यांच्यातर्फे दिनांक 21 मार्च 2025 पासून श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला आहे कथेचे निरूपण ह भ प देवदत्त महाराज हे करत असून श्री शिव महापुराणातील विविध कथांचे निरूपण करत असताना शिवपंचाक्षरी मंत्र तसेच मौनव्रताचे महत्व श्री शिव महापुराण कथेत सांगण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button