सामाजिक

अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जाहीर

जळगाव दि. १६ : सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता.१८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते दिला जाणार आहे. १९९२ पासून सुरू झालेला हा पुरस्कार यापुर्वी स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ तात्यासाहेब लहाने, पद्मश्री डॉ. गणेश देवी, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांच्यासह इतर मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button