लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.१९ जुलै २०२४ |
जुने जळगांव येथील पांझरा पोळ टाकी चौकातील
धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यास वाहून घेतलेल्या तरूण कुढापा मंडळाच्या जळगाव शहरातील गणेश उत्सव 2024 साठी प्रथम पाठपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यंदा मंडळाचे ६१ वे वर्ष आहे
पाटपुजन सोहळा साठी आज जळगाव शहर विधानसभा मतदासंघां चे आमदार राजू मामा भोळे व माजी महापौर जयश्री महाजन,माजी उपमहापौर सुनील खडके माजी नगरसेवक शरद तायडे सामाजिक कार्यकर्ते पियुष ललित कोल्हे महेश चौधरी, हॉटेल स्टार पॅलेस चे संचालक नंदू चौधरी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आतुरता तुझ्या नव्या रूपाची पाटपुजनाने आरंभ करतो एकसष्टपुर्ती सोहळयाची ह्या घोषणेने जल्लोषात संपन्न झाला.
याप्रसंगी मंडळाचे सदैव प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून कार्यरत असणारे स्वर्गीय कुंदन सुधीर चौधरी व .रवींद्र अण्णा चौधरी यांना सुद्धा मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली..
सदरील पाटपूजन कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरता मंडळाचे अध्यक्ष भोजूराज बारी व उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र पाटील, सतीश ठाकूर, शंभू भावसार प्रशांत सुरळकर, नारायण कोळी, पंकज भावसार, विशाल दिगंबर पाटील, बंटी चौधरी, अनिल चौधरी रवींद्र माळी, चेतन चौधरी, राहुल कोळी, मोहित पाटील, जयेश अत्तरदे, विकी ठाकूर, जयेश कोल्हे, हरीश चौधरी, बंटी कोळी सुमित सपकाळे, गौरव सोनार, निलेश माळी, यश मराठे, रोहन कोल्हे, यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.