जळगांव जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

अशोकभाऊ :- आधारवड, प्रेरणादायी दीपस्तंभ

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १० फेब्रुवारी २०२६ : कर्तृत्व, दातृत्व अन् नेतृत्वाचे धनी 

युवकांचे श्रद्धास्थान असलेले जैन इरिगेशन सिस्टिम्स आणि

उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन विशेष….

जीवनाच्या प्रवासात काही व्यक्ती

फक्त सोबत चालत नाहीत,

तर वाट दाखवतात, सावली देतात,

आणि थकलेल्या पावलांना आधार होतात…

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे असेच एक नाव आहे., जे उच्चारताच विश्वास जागा होतो.

पितृतुल्य अशोक भाऊ खऱ्या अर्थाने सर्वांचे आधारवड आहेत.

त्यांच्या शब्दांत मायेची ऊब आहे,

तर कृतीत कर्तव्याची निष्ठा आहे.

कोणाच्याही यशात ते पुढे नसतात,

पण प्रत्येक यशामागे त्यांचा हात असतो.

क्रीडा असो वा आरोग्य,

शिक्षण असो वा धर्म,

सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहांत

ते सतत आशेचा दीप प्रज्वलित करतात.

प्रोत्साहन देताना ते मोजत नाहीत वेळ, श्रम वा साधनं, कारण त्यांच्यासाठी समाज हेच कुटुंब आहे.

राष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांसाठी ते सुख-सुविधांचा,साहित्यांचा पूल उभारतात, स्वप्नांना पंख देतात आणि म्हणतात. “तू पुढे जा, आम्ही मागे उभे आहोत.”

आई कांताईंच्या मायेचा ओलावा

आणि श्रद्धेय भवरलालजी जैन

अर्थात मोठेभाऊ यांच्या संस्कारांचा दीप

आजही त्यांच्या विचारांत तेवत आहे.

वसा जपताना त्यांनी वारसा उजळवला,

आणि मूल्यांची मशाल पुढील पिढीकडे सोपवली.

अशोकभाऊ म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे,

एक आधार आहे, एक संस्कार आहे,

एक शांत पण तेजस्वी माझ्या जीवनातील उपस्थिती आहे. अनेक जीवनांच्या अंधारात

ते आजही आशेचा उजेड पेरत आहेत…

*आदरणीय अशोक भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!*

– देवेंद्र पंढरीनाथ पाटील, (9404955245)

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button