जळगांव दि.२१ : सुरभी महिला बहुउद्देशिय मंडळा तर्फे नुकतेच अमिषा डाबी ह्यांच्या सहकार्याने, गुरांना व मोकाट कुत्र्यांना पाणी पिण्यासाठीचे सिमेंटचे भांडे वाटप करण्यात आले.
सुरभी महिला मंडळतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून अमिषा डाबी ह्यांच्या सहकार्याने, विजय कॉलनी, रेल्वे कॉलनी, चंद्रप्रभा कॉलनी, गणेश कॉलनी, शिवकॉलनी, कृषी कॉलनी व जवळील परिसरात गुरांना पाणी पिण्यासाठीचे सिमेंटचे भांडे वाटप करण्यात आले.
सध्या उन्हाळ्याची सुरवात झाली आहे, रस्त्यानी फिरणारे गुरे, गाई,म्हशी, कुत्रे पाणी पिण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतात, त्यांना पाणी पिण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून अमिषा डाबी ह्यांच्या सहकार्याने सदर भांड्यांचे वाटप करण्यात आले.अशी माहिती अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी दिली. मंजूषा राव, सुनीता सातपुते, संजीवनी नांदेडकर, पूनम जोशी, अविता जन्म, वंदना महाजन ह्यांनी गुरांना पाणी पिण्यासाठी वाटण्यात आलेले भांडे आपल्या अंगणात ठेवून पाणी पिण्याची सोय केली आहे. मागील वर्षी सुद्धा पक्षांसाठी भांडी वाटण्यात आली होती.