जळगांव जिल्हासामाजिकसांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे श्वास आणि प्राण : ना. गुलाबराव पाटील

जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १९ फेब्रुवारी २०२६ :  “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी असे भावनिक प्रतिपादन केले.

जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमास वस्त्रोद्योग मंत्री तथा सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष संजय सावकारे, महापौर दिपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जैन इरिगेशन सिस्टीम लि. चे चेअरमन अशोक जैन अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, जळगाव गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने आणि सर्वसमावेशक पद्धतीने शिवजयंती साजरी करत असून समाजातील सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शिवरायांची जयंती साजरी करण्याची परंपरा जळगाव शहरात रुजवली आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करत पालकमंत्री पुढे म्हणाले की, “शिवजयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर एक सामाजिक एकात्मतेचा संदेश आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही समिती सातत्याने करत आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात, “शिवरायांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या कृतीत उतरवला पाहिजे. शिवरायांचे चरित्र हे सर्वांसाठी कायम प्रेरणादायी आणि ऊर्जास्रोत राहणार आहे.”

शिवजयंती महोत्सव समितीच्या उपक्रमांचे कौतुक करत पालकमंत्री यांनी आयोजकांचे अभिनंदन करून सर्व उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यावेळी आपल्या मनोगतात म्हणाले, आपल्या देशाचे महापुरुष व जे शूर वीर आहेत त्यांना कुठल्याही जाती धर्मात बांधताकामा नये, त्यांनी जी कामे केली आहेत ती प्रत्येक जाती धर्मासाठी व या देशासाठी केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या देशाला हिंदुत्वाची कास दिली आपला धर्म व संस्कार जागृत ठेवला त्यामुळे आज आपण हिंदू म्हणून अभिमानाने जगतोय ही सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. शिवजयंती उत्सवात सर्व जाती धर्माचे,पक्षाचे लोक एकत्र सहभागी झाले असल्याचे सांगून मंत्री श्री सावकारे यांनी, शिवजयंती कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व शिवप्रेमीं, शिवभक्तांना यावेळी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित शिवभक्तांच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारीत जीवंत देखाव्यांच्या माध्यमातून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध शाळांचे, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे समन्वयक शंभू पाटील यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button