जळगांव जिल्हाक्राईम

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, ४ महिलांची सुटका : राजस्थान-हरियाणाच्या दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव शहरात गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ पोलिसांची धडक कारवाई

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. १९ : शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या नयनतारा मार्केट मॉल येथे मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर एलसीबीसह जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने कारवाई केली आहे. एकूण ४ महिलांची सुटका करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्यासह हरियाणाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ नयनतारा ऑर्किड मॉल येथे दुकान नंबर ४०८ मध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली व्यवसाय चालतो अशी माहिती एलसीबीला मिळाली होती.त्यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने मसाज सेंटरवर छापा टाकण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. तिथे संशयित राजू मधुजी जाट (रा.कलोधिया ता. पिंपरी जि. भीलवाडा,राजस्थान) याने बनावट ग्राहकाला व्यतिरिक्त इतर सेवा देण्यासाठी आमिष दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

छाप्यामध्ये ४ महिलांच्या मार्फत पाच सेंटरच्या विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. त्याचा मालक संशयित विक्रम राजपाल चंदमारी धानी (वय २० वर्ष रा. चत्तरगढ पत्ती जि. सिरसा, हरियाणा) हा व्यवसायाला प्रोत्साहन देत होता. म्हणून दोघांविरुद्ध पिटा ऍक्ट प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मॅनेजर राजू जाट याला अटक करण्यात आली आहे. तर सदर महिलांना आशादीप महिला वस्तीगृहात पाठवण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही जळगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, सपोनी शितल कुमार नाईक, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक निरीक्षक महेश घायतळ, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनील पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली महाजन, हेडकॉन्स्टेबल प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दीपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button