
लोकमाध्यम न्युज जळगांव दि. ११ : येथील गुजराल पेट्रोल पंपा समोरील ओम शांतीनगर येथे ओम शांती सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्कार मंडळ तसेच ओम शिव शंकर मंदिर प्रांगणामध्ये स्व. प्रा.पी व्ही कोळी सर, स्व. कुसुमबाई कोळी आणि स्व. जयश्री कोळी यांचे पुण्य स्मरणार्थ आज रविवार दिनांक ११ मे ते शनिवार दिनांक १७ मे पर्यंत श्रीमद् भागवत कथा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. दररोज रात्री आठ वाजता कथेला प्रारंभ होईल. ह भ प देवदत्त महाराज मोरदे, जळगावकर हे या कथेचे निरूपण करणार आहेत. कथेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. दररोज पहाटे साडेपाच वाजता काकड आरती होणार असून संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ तसेच विष्णुसहस्त्रनाम होणार आहे.
भूषणकुमार सूर्यवंशी, संगीता भूषणकुमार सूर्यवंशी, राजश्री भोजू कोळी तसेच ओम शांतीनगर परिवार यांनी या कथा सप्ताहाचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी नियोजन व मार्गदर्शन प्रा. शांताराम बापूजी पाटील हे करीत आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आलेले आहे.





