जळगावअध्यात्मिकधार्मिक

भगवान शिवावर अखंड श्रद्धा, प्रेम आणि समर्पण ठेवून केलेली उपासना म्हणजे शिवभक्ती – देवदत्त महाराज

सोमवार ९ मार्च रोजी शिवपार्वती विवाह आणि खाटू शाम बाबा दरबारचे आयोजन

|लोकमाध्यम न्युज | : जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरा मागील गणेश वाडी दत्त मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा श्री शिव महापुराण कथेचे बुधवार दिनांक ४ मार्च ते १० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. रणरणत्या उन्हात आणि तप्त वातावरणात सुद्धा असंख्य असंख्य भाविकांची कथेला उपस्थिती असते.

शिव भक्ती म्हणजे भगवान शिवावर अखंड श्रद्धा, प्रेम आणि समर्पण ठेवून केलेली उपासना आहे,ॐ नमः शिवाय मंत्र जप हा शिवाचा सर्वात प्रभावी मंत्र आहे. रोज जप केल्याने मन शुद्ध होते.महामृत्युंजय मंत्र जप हा मंत्र आरोग्य, दीर्घायुष्य आणि संकटांपासून संरक्षण देतो. असे ह भ प देवदत्त महाराज जळगावकर यांनी कथेचे निरूपण करतांना सांगितले. सोमवार दिनांक ९ मार्च रोजी कथेमध्ये शिवपार्वती विवाह कथा संपन्न होणार आहे.

तसेच कथेच्या दरम्यान दररोज रात्री सात ते दहा वाजेला संगीत भजन संध्या होत असून उज्वला ताई वर्मा हे भजन तसेच सुंदरकांड सादर करीत आहेत. सोमवार दिनांक ९ मार्च रोजी रात्री सात वाजेपासून खाटू श्याम बाबा दरबार आयोजित करण्यात आलेला आहे 

दिनांक १९ मार्च मंगळवार रोजी संध्याकाळी कथा झाल्यानंतर साडेपाच वाजता ग्रंथाची शोभायात्रा निघेल.

दिनांक ११ मार्च बुधवार रोजी सकाळी दहा वाजता गोपाळकाल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद संपन्न होईल

जास्तीत जास्त भाविकांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन संजय चौधरी विठोबा तसेच नगरसेविका मंगलाताई संजय चौधरी यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button