लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.३० जुलै २०२४ |
२९ जुलै रोजी काँग्रेस मुख्यालय टिळक भवन दादर येथे प्रशासकीय सचिव प्रमोद मोरे व महाराष्ट्र प्रदेश सेल समन्वयक प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते व अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार, उपाध्यक्ष गोकुळ बोरसे, अमळनेर तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, धुळे उपाध्यक्ष के डी पाटील यांच्या उपस्थितीत संदीप घोरपडे यांना वक्ता सेल जळगाव जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती दिली
काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वर्षानुवर्ष काम करीत आहे. यात राजकीय माध्यमातून देशाची जडणघडण सत्ताप्राप्तीनंतर सर्वसामान्यांना सेवा सुविधा प्रदान करीत असतानाच सामाजिक प्रक्रिया योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्नरत असा संघटनात्मक पक्ष आहे. यात सामाजिक घुसळण योग्य रीतीने करून तळागाळातील किंवा मुख्य प्रवाहापासून दूर असणारे विविध सामाजिक घटक मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष हा विविध सेलच्या माध्यमातून रचनात्मक कार्य शेकडो वर्षापासून करीत आहे. यात आपापल्या क्षेत्रातील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध प्रशिक्षणाच्या शिबिरांचे माध्यमातून अनेक कलावंत विचारवंत लेखक कवी अभ्यासक यांना समाज मन तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या व्याख्यानमाला जाहीर सभा अथवा अभिव्यक्तीचे इतरही मार्ग अवलंबविण्यासाठी हे सेल कार्यरत असतात. आणि या कार्यासाठी वक्ते तयार करणेकामी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देशपातळीपासून राज्य पातळी मार्गे जिल्हा व तालुका वार वक्ते तयार करीत असतात आणि हे कार्य वक्तासेल यांच्या माध्यमातून यथासांग पार पाडले जाते .
संदीप घोरपडे हे शालेय जीवनापासून नाट्य क्षेत्राशी आपली नाळ जोडून आहेत. नाट्य क्षेत्रातील त्यांचे काम जळगाव जिल्हा तर जाणतोच पण महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून त्यांना दोन वेळा सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाची शिखर प्रशिक्षण संस्था यशदा या संस्थेत देखील संदीप घोरपडे राज्यस्तरीय प्रवीण प्रशिक्षक म्हणून मागील पंधरा वर्षापासून जोडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांची मातृ संघटना शिक्षक लोकशाही आघाडी अर्थात( T D F) या संघटनेत अभ्यासपूर्ण वक्तृत्वाच्या जोरावर अत्यंत लहान वयात राज्याच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना मिळाली.
आध्यात्मिक क्षेत्रात वारकरी संप्रदायात स्थापन झालेला गाथा परिवार जो संत तुकाराम ज्ञानेश्वर यासह संत परंपरेतील जनजागृतीची प्रबोधनात्मक भावना महाराष्ट्रभर मांडीत असतो. त्या गाथा परिवारात देखील आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
आता काँग्रेस पक्षाचे जाहीर सभांसाठी शिलेदार तयार करण्याची जबाबदारी वक्ता सेल जिल्हाप्रमुख म्हणून संदीप घोरपडे यांच्यावर अत्यंत विश्वासाने सोपविलेली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे निभावणार असा विश्वास संदीप घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.
संदीप घोरपडे यांच्या नियुक्ती नंतर
जिल्हाभरातून त्यांना त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून,जबाबदारीच्या या प्रक्रियेत त्यांनी नियोजनाला सुरुवात देखील केली आहे.