जळगावक्राईम

एक लाखांची लाच घेताना शनिपेठ पोलिस ठाण्याचा पोलिस नाईक जाळ्यात 

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) — शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली होती.

या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर १३ एप्रिल रोजी सापळा रचण्यात आला. पडताळणीदरम्यान आरोपीने पंचासमक्ष १ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्यानुसार तक्रारदार शनिपेठ पोलीस ठाण्याबाहेर पोहोचला असता आरोपी विनोद अहिरे यांनी १ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, कर्मचारी संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी आदींचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

पोलिस अंमलदार विनोद अहिरे याच्याविरुद्ध गेल्या काही वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. मात्र या गुन्ह्यातून त्यांची सुटका झाली होती

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तत्काळ तक्रार करावी. भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button