जळगावशैक्षणिकसांस्कृतिक

बालक पालकांसाठी तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन

अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – परिक्षा संपल्यानंतर लागणाऱ्या सुट्टीत बालकांच्या मनोरंजनासोबतच त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांना जागतिक दर्जाचे सिनेमे पाहता यावेत तसेच पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि. २४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.

अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव संपन्न होणार आहे. या महोत्सवास प्रवेश विनामूल्य आहे.

दि. २४, २५ आणि २६ एप्रिल दररोज सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवात आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये व्यग्र असणाऱ्या बालकांना मोठ्या पडद्यावर दर्जेदार, प्रबोधनात्मक आणि आशयघन असणारे मनोरंजनात्मक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर दीपमाला काळे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

चित्रपट हे शिक्षणाचे आणि प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे. मनोरंजनातून व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी हा एक सुवर्णयोग आहे, त्यामुळे जळगावमधील जास्तीत जास्त बालक – पालकांनी या चित्रपट महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button