जळगांव जिल्हामहाराष्ट्रशासकीय

विधान परिषद निवडणूक २०२६ जाहीर; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

| लोकमाध्यम न्युज |जळगाव, दि. १८ (जिमाका ) :  महाराष्ट्र विधान परिषद दिवार्षिक निवडणूक २०२६ ची घोषणा झाली असून आजपासून दिनांक २५ जून २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागु राहणार असून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

आचारसंहितेनुसार कोणत्याही खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर विनापरवाना पोस्टर्स लावणे, भित्तीलेखन करणे, निवडणूक चिन्हे काढणे, कापडी फलक किंवा झेंडे लावणे तसेच इतर कोणत्याही प्रकारे मालमत्तेचे विद्रुपीकरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित व्यक्ती पात्र असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button