जळगांव जिल्हाशैक्षणिकसामाजिक

मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. दहावी, बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्रासह भारतासाठी पदक मिळवून देणारी कु. सहीष्णा सचिन सोमवंशी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेश्क, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई), राजेश मोरे (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव), डॉ. निलेश देविदास पाटील (शिक्षणाधिकारी – प्राथमिक, जळगाव), कपिल जयकर पवार (उपसंचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक), निलेश रणजित भोईटे (सचिव, जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव) अनिल तुकाराम पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव) प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांची उपस्थिती होती.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच क्रीडा, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

हा सन्मान सोहळा जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, मराठा सेवा संघ प्रणीत आणि मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button