जळगांव जिल्हाऔद्योगिकशैक्षणिक

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात १५ जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. १४ : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, मॉडेल करिअर सेंटर, जळगाव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात प्रामुख्याने इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २०७ हून अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात जैन इरिगेशन प्रा. लि., स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., छबी इलेक्ट्रिकल्स प्रा. लि., रेमंड प्रा. लि., लिग्रण्ड प्रा. लि., अॅस्टीमो प्रा. लि., एडीको प्रा. लि. (पुणे) तसेच आकाशवाणी, जळगाव यांसारख्या नामांकित आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

सदर पदांसाठी आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, बी.ई., बी.टेक., बी.एस्सी., पदवीधर, इंजिनिअरिंग असिस्टंट तसेच इयत्ता १० वी व १२ वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नोंदणी करून संबंधित रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व बायोडाटासह मुलाखतीच्या दिवशी रोजगार मेळाव्यात उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव संदीप ज्ञा. गायकवाड यांनी प्रसिध्दी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button