महाराष्ट्रजळगांव जिल्हा

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून पाहणी

लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. १२ऑगस्ट २०२४ |

संपूर्ण राज्यात महिलांच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांसाठी एस टी प्रवासात सवलत आणि आता मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना, यामुळे महिलांच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यासर्व योजनाच्या बाबतीत बहिणींशी सुसंवाद करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार हे सर्वजण उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम मंगळवारी दुपारी 2.30 वाजता सागर पार्कवर होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.


सागर पार्कवर होणार असलेल्या कार्यक्रमाची तयारी सुरु असून त्याची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
13 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला जवळपास 40 हजार बहिणीसह इतर जिल्ह्यातील लोकं, सरपंच उपस्थित राहतील. त्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. शहरात विविध तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात दत्त मंदिर ते सिंध कॉलनी रोड, डी मार्ट ते काव्य रत्नावली चौक, खान्देश मॉल पार्किंग, जी. एस. मैदान, …. अशा पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button