युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

| लोकमाध्यम न्युज |जळगाव दि. १४ प्रतिनिधी : अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलात ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या खुल्या युथ फायटर तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनने सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील विविध अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बोदवड येथील पॅन्थर तायक्वांडो अकॅडमीने ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि १२ कांस्यपदकांची कमाई केली. जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या कौशिकी चौबे, जिज्ञासा पाटील, दक्ष पाटील, मयुर पाटील, क्षितीज बोरसे, देवयानी पाटील, निकिता पवार, पुष्पक महाजन आणि यश शिंदे यांनी सुवर्णपदक पटकावले. कोमल गाढे व आरोही गवळे यांनी रौप्यपदक, तर सिद्धी पाटील व ओवी राणे यांनी कांस्यपदक मिळविले.
या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक जयेश बावीस्कर, जयेश कासार, निकेतन खोडके आणि निकिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव अजित घारगे, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले. जळगाव जिल्हाने सलग चौथ्यांदा मिळविलेला हा बहुमान जिल्ह्यातील तायक्वांडो खेळाडूंच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मानले जात आहे.





