जळगावसामाजिकसांस्कृतिक

दिव्यांगांच्या हजारो दिव्यांनी उजळले चिमुकले श्रीराम मंदिर! दिव्यांगांनी सजविल्या पणत्या, मान्यवरांनी केले कौतुक!

| लोकमाध्यम News | जळगाव – जळगाव जिल्ह्यातील रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी यंदा देखील आपली आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. चिमुकले श्रीराम मंदिरात ११११ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रुशिल मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो. दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी सजवलेल्या विविधरंगी पणत्या प्रज्वलित करून हा उपक्रम चिमुकले श्रीराम मंदिरात पार पडत असतो. यंदा देखील चिमुकले श्रीराम मंदिरात ११११ पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मिहिका घुगे, जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन, ज्योती जैन, पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे, ह.भ.प. दादा महाराज जोशी, नगरसेवक अमित काळे यांच्यासह जैन उद्योग समुहाचे मीडिया संचालक अनिल जोशी, सुनील खैरनार, माजी नगरसेवक पांडुरंग (बंडू) काळे, परेश सनांसे, वैशाली सनांसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.

उडान दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे आयोजित हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून दिव्यांग मुलांनी केलेली मेहनत आणि कलाकुसर कौतुकास्पद आहे. आगळीवेगळी दिवाळी समाजाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. उडाण एक संस्था नव्हे दिव्यांगांना स्वबळावर उभे करण्याचा विचार आहे. दिवाळीच्या अगोदर दिव्यांग विद्यार्थी स्वतः ३ लाख पणत्या सुशोभित करतात, त्यातून त्यांना रोजगार देखील मिळतो. दीपोत्सवाच्या माध्यमातून सर्वांच्या आयुष्यात सकारात्मतेचा प्रकाश पडावा आणि दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक चांगला व्हावा, हाच आमचा उद्देश असल्याचे हर्षाली चौधरी यांनी सांगितले.उपक्रमासाठी उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, प्रवीण चौधरी, हेतल पाटील, जयश्री पटेल, महेंद्र पाटील, कल्पना रोटे, प्रतिभा पाटील, रितेश पाटील, वनमाला कोळी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन अक्षय नेहे यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button