लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२३ जुलै २०२४ |
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
२०१७ साली भाजप सरकारने शरदचंद्रजी पवारांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आणि आता त्याच सरकारचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या विषयी बेताल वक्तव्य करीत आहेत “शरद पवार भ्रष्टाचार चे सर्वात मोठे सरगना आहेत” असे डोके फिरू आणि बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच देशाचे पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या निवडणुक वेळेस शरद पवार भटकती आत्मा म्हणून बोलले होते. याचेच नुकसान त्यांना महाराष्ट्रात नुकताच झालेल्या लोकसभेत झाले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि या दौऱ्याला मतदारांचा व नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच कारणाने भाजपच्या नेत्यांची पायाखालची वाळू ही सरकत आहे. त्यामुळे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असे डोके फिरू वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे. विरोधकांना मैदानात उतरवून त्यांना दांडुक्यांनी मारा असे माथे फिरू आणि भडकाऊ वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस करत आहे यामुळे महाराष्ट्रात असलेली शांतता भंग करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.
अमित शाह यांनी आपल्या पक्षात असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांचा विचार करावा. आदर्श घोटाळा , सिंचन घोटाळा, शालेय घोटाळा ,आदिवासी घोटाळा , बांधकाम घोटाळा खरे भ्रष्टाचार चे महामेरू हे भाजपात आहेत. याचा अभ्यास अमित शाहणी करावा आणि त्यानंतर टीका करावी. सदर आंदोलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला जोडे मारून व निषेधाच्या घोषणा देऊन तीव्र आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवांजरी, जिल्हा समन्वयक विकास पवार,युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील,महानगर महिला अध्यक्ष मंगला पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी ,सहकार सेल अध्यक्ष वाल्मीक पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण , शहर संघटक राजू मोरे , अल्पसंख्यक महानगर जिल्हाअघ्यक्ष डॉ रिजवान खाटीक, डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी , ॲड.सचिन पाटील ओबीसी आघाडी जिल्हाअघ्यक्ष नामदेव वाघ, महानगर जिल्हाउपाघ्यक्ष किरण राजपूत, महानगर जिल्हाउपअघ्यक्ष अमोल कोल्हे, महानगर जिल्हासरचिटणीस रहीम तडवी , युवक महानगर जिल्हाउपअध्यक्ष चेतन पवार ,शैलेश अभंगे , समाजिक न्याय संघटक संजय जाधव , रफिक शहा, अयाज शहा ,चंद्रकांत चौधरी , राष्ट्रवादी ऑटो रिक्शा महानगर जिल्हाअघ्यक्ष गणेश सोनार , अल्पसंख्यक महानगर सरचिटणीस मतिन सैय्यद , भल्ला तडवी इतर पदाधिकारी कार्यकर्त मोठया उपस्थित होते.