स्त्रीरोग तज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
अध्यक्ष डॉ.विलास भोळे तर सचिव डॉ.शीतल भोसले
जळगाव दि.८ स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा दिनांक ७ रोजी डॉक्टर उल्हास पाटील यांचे अध्यक्षतेखाली व डॉक्टर अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ विलास भोळे यांनी मावळते अध्यक्ष डॉक्टर सीमा पाटील यांचेकडून पदभार स्विकारला . तसेच डॉ शीतल भोसले यांनी नूतन सचिव म्हणून डॉ दिप्ती पायघन यांचेकडून पदभार स्विकारला.नूतन कार्यकारणीत डॉ. विनोद चौधरी वरणगाव,डॉ. भावना चौधरी,डॉ. संदिप पाटील,डॉ. स्वप्निल रावेरकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ श्रद्धा पाटील, डॉ पूनम येवले , डॉ.नितीन चौधरी,डॉ. प्रियंका चौधरी,डॉ. योगिता पाटील, व डॉ. जया शिंदे ह्यांनी पदभार स्विकारला. डॉ श्रद्धा पाटील व डॉ प्रियंका चौधरी ह्यांनी सूत्रसंचालन केले व डॉ प्रशांत पाटील ह्यांनी आभारप्रदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाभिमुख उपक्रम हाती घेऊन जळगाव जिल्यातील स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जनजागृती करण्याचा मानस डॉ शीतल अविनाश भोसले ह्यांनी व्यक्त केला.