शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून शाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी मुख्याध्यापकाला लाच घेताना रंगेहात पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २० जानेवारी २०२५ |
प्रतिनिधी:- शाळेची तपासणी झाली असून शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून शाळेला चांगला शेरा मिळावा यासाठी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये मागितले असून एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शिक्षकाकडून एक हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये ची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकाला १ हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक केल्याची घटना आज उघडकीस आली असून या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
बळीराम सुभाष सोनवणे वय 55 असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे.
पिंपळकोठा येथील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले तक्रारदार यांनी बळीराम सोनवणे यांनी संशयित शिक्षण विस्तार अधिकारी जी. डी. पाटील यांनी गेल्या सोमवारी शाळेचे इन्स्पेक्शन केले असल्याने त्यांनी चांगला शेरा द्यावा यासाठी दहा हजार रुपये मागितले असून मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांनी शाळेच्या प्रत्येक शिक्षकाकडून एक हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये ची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार शिक्षकांनी जळगावच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार दिली होती. आज सोमवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून बळीराम सोनवणे याला १ हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले, दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी यांची एसीबीने फोन द्वारे पडताळणी केली असता त्यांनी दोन हजार रुपये मिळाल्याबाबत विरोध दर्शवला नाही. आणि नंतर कॉल करतो असे सांगून फोन ठेवून दिला. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात बळीराम सोनवणे आणि पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी जे. डी. पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
एसीबी चे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.