जळगांव जिल्हाअध्यात्मिकताज्या बातम्या

पाळधी येथे ना.गुलाबराव पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

लोकमाध्यम न्युज जळगांव २७ : राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त पाळधी येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे दिनांक २७ मे ते ३जून पर्यंतआयोजन करण्यात आले आहे.अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे यंदा तिसरे वर्ष आहे.अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचा शुभारंभ २७/०५/२०२५. मंगळवार ते सांगता दिनांक ०३/०६/२०२५. मंगळवार रोजी होणार आहे.

दैनंदिन कार्यक्रम
सकाळी ५ ते ६ काकडा आरती संध्या ५ ते ६ हरीपाठ  रात्री ८.०० ते १०.०० कीर्तनाचा कार्यक्रम.

जेष्ठ शु. ०१, मंगळवार, दि. २७ मे २०२५ पी.ह.भ.प. खान्देशभुषण रविकिरणजी महाराज, दोंडाईचेकर

जेष्ठ शु. ०२, बुधवार, दि. २८ मे २०२५ सौ.ह.भ.प. भागवताचार्य कांचनताई जगताप अध्यक्ष-संत निवृत्तीनाथ संस्थान-त्र्यंबकेश्वर (नाशिक)

जेष्ठ शु. ०३, गुरूवार, दि. २९ मे २०२५ श्री.ह.भ.प. युवक वीर ज्ञानेश्वरजी महाराज पठारे कर्जतकर-जामखेड

जेष्ठ शु. ०४, शुक्रवार, दि. ३० मे २०२५ श्री.ह.भ.प. शंभुश्री ज्ञानेश्वरजी महाराज, पाळधीकर
जेष्ठ शु. ०५, शनिवार, दि. ३१ मे २०२५ श्री.ह.भ.प. धर्माचार्य निवृत्तीजी महाराज, इंदुरीकर

जेष्ठ शु. ०६, रविवार, दि. ०१ जून २०२५ श्री.ह.भ.प. भागवताचार्य बालुजी महाराज, गिरगावकर-परभणी

जेष्ठ शु. ०७, सोमवार, दि. ०२ जुन २०२५ श्री.ह.भ.प.विनोदवैभव ज्ञानेश्वरजी महाराज तांबे

जेष्ठ शु. ०८, मंगळवार, दि. ०३ जुन २०२५ ह.भ.प.श्री.गो प्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर (काल्याचे किर्तन: सकाळी ८ ते १०) महाप्रसादाची वेळ: सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत

या सप्ताह कामी जगद्गुरू तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था, एकलप्र. साईमाऊली भजनी मंडळ, जळगाव. । बालगोपाल भजनी मंडळ, शिरसोली.यांचे सहकार्य तसेच
श्री गुरू मोठेबाबा सेवाट्रस्ट, जळगाव, जिल्ह्यातील सर्व किर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी यांची उपस्थिती लाभणार आहे.

अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे जी पी.एस मित्रपरिवार पाळधी, विक्रीबाबा युवा मंच, शिवसेना, युवासेना, समस्त भजनी मंडळ पाळधी समस्त ग्रामस्थ पाळधी बु., खुर्द यांच्या तर्फे आयोजन तसेच पाळधी व पंचक्रोशितील सर्व भाविक भक्तांच्या अनमोल सहकार्याने अखंड हरी नाम कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवणाचा आवश्य लाभ घ्यावा अशी विनंती
प्रतापराव गुलाबराव पाटील माजी. सदस्य-जि.प. जळगाव आणि विक्रम गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button