जळगावमहाराष्ट्र

पुणे – छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करावा : राज्यपालांकडे देण्यात आले निवेदन

जळगाव नागरिक मंचच्यावतीने अशोक जैन यांनी दिले निवेदन : पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

लोकमाध्यम न्युज | जळगाव १० सप्टेंबर २०२४ |

जळगाव येथे दीड दिवसांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील २०० वर मान्यवर नागरिकांशी चर्चा केली. नागरिकांनी सुद्धा संधी मिळाल्याने जळगावच्या विकासाशी संबंधित अनेक विषयांच्या मागण्या राज्यपालांकडे केल्या. अजिंठा विश्रामगृहावर राज्यपाल नागरिकांना भेटले. याच दरम्यान जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी राज्यपालांची विशेष भेट घेतली.

अशोक जैन यांनी जळगाव नागरिक मंचच्या वतीने राज्यपालांना निवेदन सादर करीत त्यात मागणी केली की, पुणे – अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडोर प्रकल्पात जळगावचा समावेश करावा. हा प्रकल्प जळगाकडे विस्तारला तर दौलताबाद, वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, अजिंठा लेणी, गांधीतीर्थ सुद्धा जागतिक पर्यटनाशी जोडले जातील. ग्रीनफील्ड कॅरिडाॅरमुळे जळगाव शहर व जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेती उत्पादने, पर्यटन, हाॅटेल्स, ट्रॅव्हल्स अशा व्यवसायांना मोठा आर्थिक लाभ होऊन रोजगार वाढू शकेल. ही बाब अशोक जैन यांनी राज्यपालांकडे स्पष्ट केली. राज्यपालांनी निवेदन स्वीकारून त्याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्रालयाकडे करणार असे आश्वासन दिले. यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर उपस्थित होते. दरम्यान याच कॅरिडाॅरची मागणी ‘क्रेडाई’ चे पदाधिकारी तथा विकासक अनीषभाई शहा यांनीही केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button