जळगावराजकिय

जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्योजक व समाजसेवक विनोद चौधरी यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ६ फेब्रुवारी २०२५ |

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व जळगाव शहरातील प्रसिद्ध उद्योजक “विनोद शांताराम चौधरी” यांनी नुकताच ब्राम्हण सभा येथे भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियान बैठकीत भाजपा नेते व जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.

विनोद चौधरी हे प्रसिद्ध उद्योजक असून गेल्या वीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सामाजिक व विविध क्षेत्रात विविध पदांवर कार्यरत असून ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे कोषाध्यक्ष व तेली समाज जिल्ह्याचे देखील कोषाध्यक्ष असून एस.एस. फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. ते विविध पदांचा कार्यभार सांभाळत असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. मंत्री गिरीश महाजन व जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील चौधरी, मनोज बारी, दिपक मंडल, राकेश चौधरी, श्याम मराठे, ललित चौधरी, मुकुंद बारी, निलेश चौधरी, ओम पाटील, जयेश चौधरी, हेमंत चव्हाण, पवन होले, अझर शेख, समाधान भोळे, शिवाजी साळुंखे, हर्षल सपकाळे, प्रणव चौधरी, तोंबादास विश्वकर्मा, मोहनदास पाटील, सुब्रोतो माहिते, जुबेर खान तसेच राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र चव्हाण यांनी पुन्हा भाजपामध्ये प्रवेश केला.

आगामी काळात पक्ष जबाबदारी देईल ती जबाबदारी मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करत राहील, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या प्रवेशाप्रसंगी भाजपचे ना. मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी भाजपचा गमछा प्रदान करून त्यांचा प्रवेश करवून घेतला. यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश(राजूमामा) भोळे, सदस्य अभियानाचे राज्य सहसंयोजक डॉ. राध्येशाम चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी पाटील, प्रदेश चिटणीस रेखा वर्मा, महानगर जिल्हा अध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव पश्चिम जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button