संदीप पाटील यांची स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस निरीक्षक पदी नेमणूक
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे कडे एमआयडीसी चा पदभार

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ३ जून २०२५
जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी तर दुसरीकडे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) करण्यात आली आहे.
इतर बदल्यांमध्ये कावेरी कमलाकर यांची चोपडा ग्रामीणवरून शनिपेठ येथे, दत्तात्रय निकम यांची अमळनेरवरच कायम, रंगनाथ धारबळे यांची शनिपेठवरून यावल येथे, प्रदीप ठाकूर यांची यावलवरून जिल्हा पेठ येथे, सुनील पवार यांची पारोळ्यावरून नियंत्रण कक्षात, सोपनि प्रमोद कठोरे यांची आर्थिक गुन्हे शाखेतून पहूर येथे, सोपनि जनार्दन खंडेराव यांची वरणगाववरून यावल येथे, सपोनि अमितकुमार बागुल यांची भुसावळ बाजारपेठेतून वरणगाव येथे, सपोनि प्रकाश काळे यांची पिंपळगाव हरेश्वरवरून जळगाव शहर येथे, सापोनि कल्याणी वर्मा यांची जळगाव शहरावरून पिंपळगाव हरेश्वर येथे, तर पोउनि सोपान गोरे यांची पाचोरावरून एलसीबी येथे बदली करण्यात आली आहे.





