जळगांव जिल्हाक्राईम

अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला ; १८ तलवारींसह एकाला अटक,पाचोरा पोलिसांची कारवाई

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१९ सप्टेंबर २०२५ :पाचोरा शहरात अवैध शस्त्र विक्रीचा डाव पोलिसांनी उधळला. माहिजी नाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ पकडत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या. या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, जप्त शस्त्रांची किंमत अंदाजे ५४,००० रुपये आहे.

दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात एक इसम तलवारी विक्रीसाठी घेऊन आला आहे. तत्काळ पोलिसांनी सापळा रचून सोहेल शेख तय्युब शेख (वय २४, रा. स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला ताब्यात घेतले. कसून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून १८ तलवारी जप्त करण्यात आल्या, ज्या त्याने विक्रीसाठी लपवून ठेवल्या होत्या. याशिवाय, त्याने काही तलवारी आधीच विक्री केल्याचेही उघड झाले.

या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. क्रमांक ४६०/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोकॉ संदीप राजपूत, जितेंद्र पाटील आणि हरीष परदेशी यांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला. या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button