जळगांव जिल्हाक्राईम

रिक्षात प्रवाशाची २५ हजार रुपयांची रोकड चोरणारी टोळी उघडकीस ; एकाला अटक

एलसीबीच्या पथकाची कारवाई ; अन्य फरार दोघांचा शोध सुरु

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि.१९ सप्टेंबर २०२५ :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षात बसलेल्या प्रवाशाच्या खिशातील २५ हजार रुपये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दिनांक १९ सप्टेंबर रोजी फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली कि, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ते जळगाव येथून रिक्षाने भुसावळला येत असताना रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये रोख चोरले. यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. ६६९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी शोयब हमीद खान (वय २५, रा. शाहूनगर, भिस्ती मोहल्ला, जळगाव) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, त्याने हा गुन्हा प्रधुम्न उर्फ बंटी नंदू महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) आणि टोनी (पूर्ण नाव माहित नाही, रा. पिंप्राळा) यांच्यासह केला. त्याच्याकडून त्याच्या हिस्स्याचे ३ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली प्रवासी रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतर दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

आरोपी शोयब खान याने जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतही अशाच प्रकारे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेला आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, तपास सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, उमाकांत पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील, पोकॉ प्रशांत परदेशी, रवींद्र कापडणे, तसेच तांत्रिक सहाय्यक पोकॉ पंकज खडसे, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button