पद्मालय येथून शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ
वाजत - गाजत या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आवाहन
लोकमाध्यम न्युज | जळगाव २६ ऑक्टोबर २०२४ |
जळगाव / धरणगाव दि. 26 – शिवसेना , भाजपा अजितदादा गट राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ 27 ऑक्टोबर 2024 सकाळी 7.30 वाजता पवित्र आणि ऐतिहासिक अश्या श्री क्षेत्र पद्मालय येथे होत आहे. जिथे श्रद्धा आणि विकासाचे संकल्प सिद्ध होणार आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील व पदाधिकारी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून प्रचाराचा नारळ वाढवून म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचार करणार आहेत.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे , रॉ.कॉ. चे रमेशबापू पाटील व सेनेचे संजय पाटील सर, भाजपाचे सरचिटणीस डी. जी. पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, रवी कापडणे, अनिल भोळे ,भाजप तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण पाटील, श्याम पाटील, धरणगाव व नशिराबाद शहर प्रमुख विलास महाजन, विकास धनगर तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीतर्फे उपस्थितीचे आवाहन करण्यात आलेआहे.
प्रचार दौरा : म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गट
श्री क्षेत्र पद्मालय येथे सकाळी 7:30 वा. नारळ वाढविण्याचा शुभारंभ झाल्यानंतर म्हसावद स. 9:00 वा – बोरणार, स .11:00 वा – लमांजन, दुपारी 12:30 व – कुऱ्हाळदे, दुपारी 1:00 वा प्रचार सुरू राहील त्यानंतर वावडदा येथे दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून बिलवाडी येथे दुपारी 3:30 वा, डोमगाव – सायंकाळी 4:30 वा, बिलखेडा- सायंकाळी 5:30 वा. त्यानंतर वावडदा येथे सायंकाळी 6:00 वा. प्रचाराला सुरुवात होणार आहे.