जळगांव जिल्हामहाराष्ट्रशासकीय

जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ९ ऑक्टोंबर २०२५: जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवार दि.09 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला. यापूर्वी श्री. घुगे जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले असून ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.

दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली असून त्यांच्या जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर व निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button