लग्नपत्रिकेत मतदानाची जनजागृती, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक..!
पत्रकार विजय पाटीलचा स्तुत्य उपक्रम
जळगाव दि.३ मे २०२४ : प्रत्येक तरुण हा आपले लग्न मोठ्या हौस मौजेत करत असतो व लग्न सोहळा नेहमी अविस्मरणीय राहावा यासाठी तो वेगवेगळे उपक्रमांचे नियोजन करत असतो. अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातीलतील धरणगाव तालुका, सोनवद गावातील विजय पाटील या पत्रकार तरुणाने आपल्या लग्न पत्रिकेतून तसेच लग्नात वऱ्हाडी मंडळीसह मतदानाची शपथ घेऊन मतदानाबद्दलची जनजागृती करणार आहे. त्यामुळे आजच्या तरुणांसमोर अनोखा आदर्श विजयने उभा केला आहे.विजय पाटील यांचे ५ मे रोजी लग्न सोहळा पार पडत असून या लग्न सोहळ्याच्या पत्रिकेत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा असा आशय पत्रिकेत नमूद केला आहे. त्यामुळे मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जिल्हा प्रशासनाला विजय पाटील यांनी सुद्धा हातभार लावला असून मी सुद्धा स्वतः लोकशाहीचा घटक असल्याचे यातून सिद्ध केले आहे.
स्तुत्य उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी केले कौतुक
विजय पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचं जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तोंड भरून कौतुक केले आहे. तसेच लग्न सोहळ्याच्या विजयला शुभेच्छा दिल्या असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आपल्या अधिकाऱ्यांसह उपस्थित राहणार आहे. विजयच्या लग्न सोहळ्याच्या दिवशी सोहळ्याला उपस्थित सर्व वऱ्हाडी मतदानाची शपथ घेतील असे सुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.