जळगांव जिल्हाक्राईम

जळगाव सायबर पोलीसांची मोठी कामगिरी — १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६२ गहाळ मोबाईल हस्तगत

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. १९ ऑक्टोंबर  २०२५ :जळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईल शोध मोहिमेत सायबर पोलीस स्टेशन, जळगाव यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत तब्बल १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६२ अँड्रॉइड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

सार्वजनिक ठिकाणे व बाजारपेठांमधून गहाळ झालेल्या महागड्या मोबाईलचा मागोवा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली होती.

या मोहिमेसाठी पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोहेकॉ/३०६८ किरण वानखेडे, पोहेकॉ/१८६६ हेमंत महाडीक, पोना/२६१ सचिन सोनवणे, पोकों/१६७५ पंकज वराडे, पोकों गौरव पाटील, पोकों मिलींद जाधव व पोकों दिपक पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या टीमने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जाऊन बारकाईने शोध घेत एकूण ६२ मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले. हस्तगत मोबाईल आज पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते संबंधित मालकांना परत देण्यात आले.

सायबर पोलीसांनी गहाळ मोबाईलचे IMEI क्रमांक व सविस्तर माहिती जळगाव पोलीसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर अपलोड केली आहे.

पोलीस अधीक्षक, जळगाव डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की — “मोबाईल हरवल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर (Central Equipment Identity Register) त्याची माहिती अपलोड करा, जेणेकरून मोबाईल शोधणे सुलभ होईल.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button