जळगांव जिल्हाक्राईम

श्रीराम रथोत्सवातील महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला चोरट्या पोलिसांच्या जाळ्यात, चोरीचा मुद्देमाल जप्त

जळगाव शहर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३ नोव्हेंबर२०२५ : शहरातील प्रसिद्ध श्रीराम रथउत्सवाच्या उत्साहात गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला चोरट्या अखेर गुन्हे शोध पथकाच्या सतर्क कारवाईत पकडल्या गेल्या असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे चाळीस हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराजवळ रथ आल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही महिला चोरट्यांनी उपस्थित महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून पलायन केले. या घटनेनंतर पीडित महिलांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने दोन विशेष टीम तयार करून तत्काळ घटनास्थळी रवाना केल्या. या पथकात सफौ/सुनील पाटील, पोहेकॉ/नंदलाल पाटील, पोहेकॉ/विरेंद्र शिंदे, पोहेकॉ/भगवान पाटील, पोहेकॉ/उमेश भांडारकर, पोहेकॉ/सतीश पाटील, पोहेकॉ/योगेश पाटील, पोकॉ/भगवान मोरे, पोकॉ/अमोल ठाकूर, पोकॉ/प्रणय पवार, मपोका/हर्षदा सोनवणे, जयश्री नराटे व मोनाली राजपूत यांनी अत्यंत दक्षतेने तपास मोहीम हाती घेतली.

पथकाने संशयित महिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांच्या ताब्यातून विविध आकारांच्या सोन्याच्या वाट्या व मणी असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये दोन सोन्याच्या वाट्या (१.८७० ग्रॅम), चार सोन्याचे मणी (०.६८० ग्रॅम), तसेच वेगवेगळ्या आकारांच्या तीन सोन्याच्या वाट्या (एकूण वजन ३.८७ ग्रॅम) यांचा समावेश आहे.

या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३७७/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या महिला आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

श्रीराम रथउत्सवासारख्या धार्मिक सोहळ्यांत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व गुन्हे शोध पथकाची अचूक कामगिरी याबद्दल शहर पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button