जळगावमहापालिका निवडणुक

अखेर महायुतीच्या उमेदवारांची यादी आली समोर …! जळगाव मनपाच्या १९ प्रभागांमधील चित्र स्पष्ट

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. ३० डिसेंबर २०२५ : जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची प्रभागनिहाय उमेदवार यादी अखेर अंतिम झाली असून, १ ते १९ या सर्व प्रभागांतील अ, ब, क, ड जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. आरक्षणानुसार उमेदवार जाहीर झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचाराला वेग आला आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये अ जागेवर भाजपच्या रिटा विनोद सपकाळे, ब जागेवर दिलीप बबनराव पोकळे, क जागेवर संगीता दांडेकर तर ड जागेवर फरदीन फिरोज पठाण हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक २ मध्ये अ मधून सागर श्याम सोनवणे, ब मधून उज्वला किशोर बाविस्कर हे शिवसेनेकडून, तर क मधून पूजा विजय जगताप व ड मधून विजय लक्ष्मण बांदल हे भाजपकडून रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ मधून भाजपच्या अर्चना संजय पाटील, ब मधून प्रतीक्षा कैलास सोनवणे, क मधून शिवसेनेचे प्रवीण रामदास कोल्हे तर ड मधून भाजपचे निलेश तायडे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये अ मधून भाजपच्या शशीबाई उर्फ शशिकला शिवचरण ढंडोरे, ब मधून विद्या मुकुंदा सोनवणे, क मधून कल्पेश कैलास सोनवणे तर ड मधून शिवसेनेचे पीयूष ललित कोल्हे निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये अ मधून शिवसेनेचे विष्णू रामदास भंगाळे, ब मधून मंगला संजय चौधरी, क मधून भाजपच्या आशा रमेश पाटील तर ड मधून नितीन बालमुकुंद लढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये चारही जागांवर भाजपने उमेदवार दिले असून अ मधून जयश्री अशोक धांडे, ब मधून सुचिता अतुलसिंह हाडा, क मधून अमित पांडुरंग काळे तर ड मधून दीपक प्रभाकर सूर्यवंशी निवडणूक लढणार आहेत.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ मधून दीपमाला मनोज काळे, ब मधून अंकिता पंकज पाटील, क मधून विशाल सुरेश भोळे तर ड मधून चंद्रशेखर अत्तरदे हे भाजपचे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये अ मधून भाजपच्या कविता सागर पाटील, ब मधून मानसी निलेश भोईटे, क मधून अमर मोतीलाल जैन तर ड मधून शिवसेनेचे नरेंद्र आत्माराम पाटील राजपूत रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ मधून मनोज सुरेश चौधरी, ब मधून प्रतिभा गजानन देशमुख हे शिवसेनेचे उमेदवार असून क मधून भाजपच्या जयश्री राहुल पाटील तर ड मधून डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये अ मधून सुरेश माणिक सोनवणे, ब मधून माधुरी अतुल बारी, क मधून कविता किरण भोई तर ड मधून जाकिर पठाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

प्रभाग क्रमांक ११ हा शिवसेनेकडे असून अ मधून डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे, ब मधून संतोष पाटील, क मधून सिंधुताई विजय कोल्हे तर ड मधून ललित विजय कोल्हे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपकडून अ मधून अनिल अडकमोल, ब मधून उज्वला बेंडाळे, क मधून गायत्री राणे तर ड मधून नितीन बरडे निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये अ मधून नितीन सपके, ब मधून सुरेखा नितीन तायडे, क मधून वैशाली अमित पाटील हे भाजपकडून तर ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रफुल्ल गुलाबराव देवकर रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक १४ मध्ये अ मधून सुनील सुपडू महाजन, ब मधून जयश्री सुनील महाजन, क मधून राबियाबी अमजद खान तर ड मधून रितिक संजय ढेकळे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये अ मधून अरविंद देशमुख, ब मधून चेतन शिरसाळे हे भाजपकडून, क मधून शिवसेनेच्या रेश्मा कुंदन काळे तर ड मधून प्रकाश रावलमल बालानी निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक १६ मध्ये अ मधून डॉ. विश्वनाथ सुरेश खडके, ब मधून वंदना संतोष इंगळे, क मधून रंजना विजय वानखेडे तर ड मधून सुनील वामनराव खडके हे भाजपचे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार असून अ मधून हिना युनूस पिंजारी, ब मधून सुमय्या वसीम पिंजारी, क मधून इकबालुद्दीन जीयाउद्दीन पिरजादे तर ड मधून प्रशांत सुरेश नाईक निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग क्रमांक १८ हा शिवसेनेकडे असून अ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, ब मधून नलुबाई तुळशीराम सोनवणे, क मधून अनिता सुरेश भापसे उमेदवार आहेत.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये अ मधून रेखा चुडामण पाटील, ब मधून विक्रम उर्फ गणेश किसन सोनवणे, क मधून निकिता अनिल देशमुख हे शिवसेनेकडून तर ड मधून राजेंद्र झिपरू घुगे पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button