जळगावधार्मिक

श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती निमित्त सुरभी महिला मंडळा तर्फे गणपती अथर्वशीर्ष आवर्तन

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ७ फेब्रुवारी २०२५ |

रेल्वे कॉलनीतील श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती निमित्त श्री रुपेश झवर व स्वाती झवर यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. सुरभी महिला मंडळ व सिद्धिविनायक महिला मंडळातील महिलांनी गणपती अथर्वशीर्ष आवर्तन केले.

माजी नगरसेविका दीपमाला काळे ह्यांनी हळदीकुंकू दिले व प्लास्टिक वापर करू नये चा संदेश दिला.व महिलांना तिळगुळ, कापडी पिशव्यांचे वाण दिले. ह्यावेळी सुरभी मंडळातील व रेल्वकॉलनी परिसरातील महिला तसेच मनोज काळे उपस्थित होते. सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्षा सुनीता गांगुर्डे, उपाध्यक्ष रुपेश माळी , तसेंच सुरभी च्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, उपाध्यक्षा मंजुषा राव, सचिव ज्योती भोकरडोळे, अश्विनी जोशी ह्यांनी सहकार्य केले. रुपेश झवर परिवारा तर्फे महाप्रसाद देण्यात आला. मंदिर सजावट पूजा माळी ह्यांनी केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button