जळगांव जिल्हाअध्यात्मिकधार्मिक

अंगारकी चतुर्थी निमित्त पद्मालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक व महापुजा संपन्न

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि.५ ( प्रतिनिधी ) – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालय गणपती मंदिर येथे अंगारकी चतुर्थीच्या पावन निमित्ताने पहाटेच्या मंगलमय वातावरणात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते अभिषेक, विधिवत पूजा व आरती संपन्न झाली. पहाटे ४ वाजता पार पडलेल्या या पूजेमुळे मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. 

पद्मालय हे गणपतीचे अत्यंत प्राचीन व जागृत स्थान मानले जाते. विशेष म्हणजे डाव्या व उजव्या सोंडेचे गणपती एकाच ठिकाणी विराजमान असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. पद्मालय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करुन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज पहाटे विधिवत पूजा व आरती केली.

व त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिराचे पुजारी गणेश वैद्य व केशवराव पुराणिक यांनी विधीपूर्वक पूजा सांगितली. पूजा संपल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंदिराचा इतिहास तसेच सुरू असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय ट्रस्टतर्फे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा शाल व गणरायाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विश्वस्त आनंदराव पाटील, भिका पाटील, गोकुळ देशमुख, डॉ. पांडुरंग पिंगळे, राजेश तिवारी, अर्जुन पाटील, शिरीष बर्वे यांच्यासह तहसीलदार गोपाल पाटील, जैन इरिगेशनचे अनिल जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते. देवस्थानचे सहकारी अशोक पाटील व जोशी यांनी पूजेचे नियोजन केले. संकष्टी, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पद्मालय येथे होणारा हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी श्रद्धेचा असतो. उन्हाची तिव्रता लक्षात घेता भाविकांसाठी पद्मालय देवस्थान तर्फे सावलीसाठी मंडपाची तसेच कुलर व थंड पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात येते. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सत्कार करताना श्री गणपती मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button