पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जिल्ह्यातील सावदा आणि किनगाव येथील रुग्णालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे रविवारी लोकार्पण
जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्यसेवा बळकटीत भर
जळगाव दि.२४ : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सावदा ता. रावेर जि. जळगांव येथे ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे आणि किनगांव ता. यावल जि. जळगांव येथे ३० खाटांचे नविन ग्रामीण रुग्णालय व निवासस्थान इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन होणार आहे.
जळगांव जिल्हयातील सावदा ता. रावेर येथे ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.
सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत ३० खाटांची असून दोन मजली आहे.तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड,एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम , पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग , आयुष बाह्य रूग्ण विभाग,लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत. अधिकारी व कर्मचारी निवासस्थान एकुण २४ आहेत.
जळगांव जिल्हयातील किनगाव ता. यावल येथे नविन ३० खाटांचे नवीन ग्रामीण रुणालय सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून मंजूर झाले होते.
या इमारतीचे तळ मजल्यावर प्रसुती गृह, महिला वॉर्ड, बाळांचा वॉर्ड, एनआयसीयू कक्ष, मेडिकल स्टोअर्स, क्ष किरण कक्ष, रक्त साठवणूक तसेच डॉक्टर्स, रुग्ण नोंदणी, नर्सिंग यांच्यासाठी रूम यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पहिला मजल्यावर शस्त्रक्रिया थियटर, रिकव्हरी रूम, पुरुष वॉर्ड, दंत बाह्य रुग्ण विभाग, आयुष बाह्य रूग्ण विभाग, लॅब यासह आवश्यक सुविधा आहेत.या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी एकूण १२ निवासस्थान आहेत.
अशा प्रकारे सर्व अत्यावश्यक बाबींचा समावेश करण्यात आलेल्या दोन्ही ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार दि. २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.