जळगावमहापालिका

जळगाव शहरात साकारणार  ४ किलोमीटरचा ग्रीन कॉरिडोर; अहमदाबादच्या अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन आणि महापालिका तर्फे उपक्रम 

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : शहराच्या निसर्गरम्य विकासासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. जळगाव शहर महानगरपालिका पर्यावरण विभाग व अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापनच्या संयुक्त विद्यमाने शहरात ४ किलोमीटर लांबीचा ‘ग्रीन कॉरिडोर’ (हरित मार्ग) प्रकल्प साकारण्यात येत आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाच्या कामावेळी ४ जून २०२६ (गुरुवार) रोजी सायंकाळी ४ वाजता निमखेडी शिवारातील चंदू अण्णा चौक येथे संपन्न होणार आहे.

या उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जळगावच्या नागरिकांच्या हस्ते सामूहिक वृक्षारोपण केले जाणार आहे.

असा असेल ‘ग्रीन कॉरिडोर’ प्रकल्प

शहरातील एकूण ४ किलोमीटरच्या दोन प्रमुख मार्गांवर हा पर्यावरणपूरक कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे.

मार्ग १: चंदू अण्णा चौक ते कचरा फॅक्टरी

मार्ग २: निमखेडी गाव ते सुरत रेल्वे गेट

या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावच्या खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि प्रभाग ९ च्या नगरसेविका जयश्री पाटील व प्रतिभा देशमुख उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी समाधान सोनवणे, जळगाव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त पंकज गोसावी, उपायुक्त धनश्री शिंदे, गायत्री महाले हे देखील उपस्थित राहतील.

“जळगाव शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी आणि शहराला हिरवेगार रूप देण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जळगाव शहरात निमखेडी भागात पश्चिमेकडून येणारे वारे आहेत. या ग्रीन कॉरिडोरमुळे शहर थंड राहण्यास मदत होणार असून यामुळे जळगावला तापमानवाढ कमी होण्यास मदत होणार आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाला जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे,” असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button