विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन; जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जिल्हा पोलिसांचा अभिनव उपक्रम!

पोलीस अधीक्षकांचे पत्रकारांना सहभागाचे आवाहन; १२ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारणार
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : १९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, पत्रकार आणि पोलीस यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आली आहे.

छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा, कर्तव्य आणि प्रेरणा यांचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घटनांचे क्षण टिपून इतिहास जतन करतात. त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्याबरोबरच समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.
सात गटांमध्ये छायाचित्रे मागविणार
स्पर्धेसाठी पुढील सात विभाग निश्चित करण्यात आले आहेत.
*- पोलीस इन पब्लिक सर्व्हिस
*- क्राईम
*- सोशल
*- ट्रॅफिक
*- जळगाव हेरिटेज
*- स्पोर्ट्स
*- वुमन एम्पॉवरमेंट
– फोटो पाठविण्याची अंतिम तारीख : १२ ऑगस्ट २०२६
– फोटो पाठविण्याचे माध्यम : व्हॉट्सअॅप क्रमांक ९७०२२००३१५
– प्रदर्शनाचे ठिकाण : पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव
– प्रदर्शनाची तारीख : १५ ऑगस्ट २०२६
– पुरस्कार : सातही विभागांमध्ये प्रत्येकी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार
– पुरस्कार वितरण : जळगाव जिल्ह्याचे मान्यवर मंत्री यांच्या हस्ते
जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी पत्रकारांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून, आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग, सेवाभाव आणि पोलीस-जनता सहकार्याचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन केले आहे.






