जळगावसामाजिकसांस्कृतिक

जळगावात आज ‘होम मिनिस्टर : खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे पुढाकार; प्रथम विजेत्याला आकर्षक पैठणी साडी मिळण्याची संधी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव विशेष प्रतिनिधी : जळगाव शहरातील महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणारा ‘होम मिनिस्टर : क्षण आनंदाचा… खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आज गुरुवारी (१३ ऑगस्ट २०२६) आयोजित करण्यात आला आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स, जळगाव शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांना विविध खेळ व स्पर्धेत सहभागी होऊन आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

यशवंत पाटील मुक्तांगण हॉल (सरस्वती नगर, जुना नेरी नाका जवळ, जळगाव) येथे गुरुवारी दुपारी ४ वाजेपासून हा कार्यक्रम रंगणार आहे.

जादुगर अविनाश दुसाने करणार सूत्रसंचालन – महिलांचा आवडता कार्यक्रम असलेल्या या ‘होम मिनिस्टर’ सोहळ्यात गप्पागोष्टी, रंजक खेळ आणि कॉमेडीचा तडका पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध जादुगर अविनाश दुसाने हे या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, प्रथम विजेत्या महिला स्पर्धकाला खास पैठणी साडी प्रदान केली जाणार आहे.

सहभागासाठी संपर्क साधण्याचे आवाहन – शहरातील सर्व माता-भगिनींनी या मनोरंजक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी महिलांनी मणियार हाईट्स, बहिणाबाई गार्डनजवळ, रिंग रोड, जळगाव येथील मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शाखेशी किंवा ९४०३७३७९१६ / ०९५६२९१६९१६ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे कळवण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button