जळगावअध्यात्मिकधार्मिक

१५४ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे दर्शन; मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ यांच्यासह भाविकांनी ओढला वहन रथ..!

महापौर दीपमाला काळे, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांच्या निवासस्थानी ‘श्री सरस्वती वहनाचे’ भक्तीमय स्वागत!

| लोकमाध्यम NEWS | जळगाव : जलग्रामोत्सव अर्थात श्रीराम मंदिर संस्थानच्या १५४ वर्षांच्या प्राचीन व ऐतिहासिक परंपरेचा वारसा सांगणाऱ्या श्रीराम रथोत्सवातील ‘श्री सरस्वती वहन’ सोहळा शनिवारी (दि. १४ नोव्हेंबर, कार्तिक शुक्ल पंचमी) अत्यंत भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे व नगरसेविका ॲड. शुचिता अतुलसिंह हाडा यांच्या रामदास कॉलनी येथील निवासस्थानी रात्री या पवित्र वहनाचे आगमन झाले. 

या प्रसंगी आयोजित पानसुपारी कार्यक्रमास राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, औद्योगिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत प्रभू श्रीरामचंद्र व श्री सरस्वती मातेचे दर्शन घेतले.

मंत्रोच्चार आणि टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत

रथयात्रेदरम्यान वहन निवासस्थानी दाखल होताच श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी आणि ब्रह्मवृंदांचे अत्यंत पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. वेदघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि “जय श्रीराम”च्या जयघोषाने संपूर्ण रामदास कॉलनी परिसर दुमदुमून गेला होता. महापौर दीपमाला काळे व नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी सहकुटुंब वहनाची विधिवत पूजा व महाआरती केली.मान्यवरांची मांदियाळी आणि स्नेहमीलन

या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे नेते ना. गिरीश महाजन, खा. स्मिताताई वाघ, उप महापौर मनोज चौधरी, माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पोलीस पाटील प्रभाकर पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी श्री सरस्वती वहन व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन जळगावकरांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे विविध नगरसेवक, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित सर्व भाविक आणि मान्यवरांचे पानसुपारी देऊन स्वागत करण्यात आले. भक्ती, परंपरा आणि आपुलकीचा संगम असलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button