लोकमाध्यम न्युज | जळगांव ६ जानेवारी २०२५ |
पाळधी :ता. धरणगाव जि. जळगाव येथील शिंपी समाज बांधव राधेश्याम शंकरराव शिंपी यांचे मुख्य रस्त्यावर असलेले बुट व चप्पल विक्रीचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होते परंतु दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री उसळलेल्या दंगलीत त्यांचे संपूर्ण दुकान राख झाले, या समाज बांधवाच्या उदरनिर्वाहाचे मार्ग बंद झाले आणि होत्याचे न होते झाले.
अचानक संकट ओढ़वले डगमगलेले मन औदासिन्याकडे घेऊन जावू नये, तसेच जगणे परावलंबी होऊ नये म्हणून
या समाज बांधवांला आर्थिक मदतीची गरज आहे. हे लक्षात घेता सामाजिक क्षेत्रातील अग्रगण जळगाव हितवर्धक संस्थेने एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’
या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे ज्यांच्या वर अचानक संकट ओढ़वले आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे.
याच उदात्त हेतुने समाज बांधवाना आर्थिक मदतीची हाक दिली त्या हाकेला प्रतिसाद देत जळगाव शहरातील समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रु.३५०००/- ( पस्त्तीस हज़ार रू मात्र )QR कोड वर मिळाले .तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष बंडू नाना शिंपी यांनी ५०००/- रोखं दिलेत तसेच मुंबई येथील
अँड महेश ढवळे वैयक्तिक ५०००/-रू अंशी एकुण ४५०००/रूपये या आर्थिक सहकार्य मुळे राधेश्याम शिंपी यांच्या अंधकारमय जीवनात एक आशेचा क्षण निर्माण झालाय समाज बांधवांनी केलेल्या अनमोल सहकार्याबद्दल राधेश्याम शिंपी यांनी जळगाव संस्थेचे व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष बंडू नाना शिंपी,हितवर्धक संस्था अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर,माजी अध्यक्ष मुकुंद मेटकर, सुरेश सोनवणे का सदस्य शैलेश सोनवणे, दिलीप भामरे, अशोक सोनवणे, योगेश सोनवणे,
किरणं सोनवणे, उमेश सोनवणे, गिरीश देवरे, पाळधी येथील ललित शिंपी, श्रीकांत कापुरे, योगेश शिंपी, संजय इसई,समाज बांधव उपस्थित होते. शिंपी समाज हितवर्धक संस्था व समाज बांधवांतर्फे याप्रसंगी समाज अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांनी राधेश्याम शिंपी यांना शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी विनंती केली आहे.