जळगावमहानगर

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा; जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर!

आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या पाठपुराव्याला यश; शहरातील १९ प्रभागांतील विकासकामांसह प्रमुख प्रवेशमार्गांवर होणार प्रकाशव्यवस्था!

 

| लोकमाध्यम News | जळगाव : जळगाव शहरातील मूलभूत सोयी-सुविधांचा विकास आणि नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

जळगाव शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांना निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून जळगाव शहरातील १९ प्रभागांमधील विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यासोबतच शहरातील प्रमुख प्रवेशमार्गांवर प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, नागरिकांना अधिक सुरक्षित व सुविधाजनक वातावरण उपलब्ध होईल.

जळगाव शहराचा सर्वांगीण विकास हा आपला प्राधान्याचा विषय असून, शहरातील विविध भागांतील उर्वरित विकासकामांसाठीही भविष्यात शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. तसेच शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठीही संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे.

यावेळी जळगांव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,. मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते, मूलभूत नागरी सुविधा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे हेच आमचे ध्येय आहे. जळगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी भूमिका आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी व्यक्त केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button