अमळनेर दि.३ मे २०२४ : जळगाव लोकसभा मतदार संघातील अमळनेर तालुक्यातून करणदादा पाटील यांना सर्वाधिक लीड देवून विजयी करु, असा विश्वास अमळनेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांनी महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांना दिला.करणदादा पाटील यांच्या प्रचारानिमित्त शुक्रवार, दि.३ रोजी अमळनेर तालुक्यातील ढेकु, शिरसाळे, तरवाडे, वावडे, जवखेडा, मांडळ, मुडी आणि बोदर्डे आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी करणदादा पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून अनुक्रमणिका क्रमांक १ वरील मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले. रॅलीत शिवसेनेच्या नेत्या ॲड. ललिता पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. व्ही. सुर्यवंशी, सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, संदीप घोरपडे, शाम पाटील, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील, दादा पवार, कारभारी आहेर, मनोज पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन नेवे, तालुका सचिव रामकृष्ण पाटील, सहसंघटक राजेंद्र पाटील गणेश पवार मुकेश राजपूत, लियाकत वायरमन, रियाज बागवान, डॉ. संचेती, नारायण पाटील, डॉ. साळुंखे, माजी सरपंच विनायक बडगुजर यांसह शेकडो ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पांडुरंग महाले - संपादक
पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया
वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत
Related Articles
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आवाहन
May 8, 2024 । 2:25 pm
४५० शेतकऱ्यांच्या बैलांसाठी पोळ्यानिमित्त ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते साज वाटप
August 29, 2024 । 2:34 pm
Check Also
Close
- स्मिताताईंना अमळनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देणारMay 9, 2024 । 5:54 pm