जळगाव जनता सहकारी बँकेचे स्थापना दिनानिमित्त आज स्नेहमिलनाचे आयोजन
आज मितीस बँकेच्या राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये ४३ शाखा

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २० जानेवारी २०२५ |
जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापनेस आज दि. 20 जानेवारी 2025 रोजी 46 वर्ष पूर्ण होत असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बँकेचे मुख्यालय “सेवा” येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेचे संचालक हिरालाल सोनवणे व सौ रेखा सोनवणे यांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात येणार आहे.
आज मितीस बँकेच्या राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये ४३ शाखा कार्यरत असून जळगाव शहरात ९, जळगाव जिल्हयातील १६ शाखा व जळगाव जिल्हयाबाहेरील १८ शाखा आहेत.बँकेचा मार्च अखेर एकत्रित व्यवसाय ३३४५ कोटी रु. असून बँकेस सतत अ ऑडिट वर्ग मिळालेला आहे. रिजर्व बँकेचे FSWM (Financially Sound & well Managed Bank) चे निकष बँकेने पूर्ण केलेले असल्याने शाखा विस्तार करण्यास परवानगी आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन एकविसाव्या शतकातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी सिद्ध असलेली जळगाव जनता सहकारी बँक आहे. डॉ. अविनाश आचार्य यांचे नेतृत्वाखाली समविचारी कार्यकर्ते एकत्र येऊन दि. २० जानेवारी १९७९ रोजी जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. समाजातील छोट्या घटकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उद्योग कर्ज योजना, पर्यावरण पूरक सोलर कर्ज योजना तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजना, शेती व शेती पूरक व्यवसायासाठी दुग्ध संपदा कर्ज योजना इ कर्ज योजनेच्या सुविधा उपलब्ध आहे.
बँकेचे मोबाइल ॲप असून बँकेने ग्राहकांच्या सोईसाठी व्हाट्सअप बँकिंग सुविधा सुरू केली आहे. यात खात्यावरील व्यवहार व स्टेटमेंट चेक करता येतात. त्याच प्रमाणे balance enquiry text massage सुविधा उपलब्ध आहे. POS व्यवहाराद्वारे ATM कार्डावरून आपण मोठ्या दुकानातून खरेदीचा आनंद मिळवू शकतो. त्याच प्रमाणे भीम ॲप, फोन पे, पेटीएम इ. वेगवेगळ्या ॲप वरून पैशांची देवाण घेवाण करू शकतो. E COM सुविधेद्वारे आपण डेबिट कार्ड पासून ऑनलाइन शॉपींग, रेल्वे तिकीट, बस तिकीट घेऊ शकतो. सन २००१ पासून बँकेने बचत गट या उपक्रमाची सुरुवात केली. त्यात आज ४२०० बचत गट असून ६१ हजार महिला सहभागी आहेत. त्यांना आजपर्यंत २०० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकेच्या मदतीने मोठ्या संख्येत महिलांचे व्यवसाय सुरू झाले.
ई-शक्ति प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्रातून जळगाव जनता सहकारी बँकेचा समावेश आहे. माय पॅड माय राइट सारख्या राष्ट्रीय पायलट प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्रातून एकमेव जळगाव जनता बँक सहभागी आहे. याव्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी जलसेवा, वृक्षारोपण, रेन वॉटर हारवेस्टिंग, ओपन जीम तसेच मतदान जनजागृती सारखे सामाजिक उपक्रम बँक राबवित असते.
बँकेच्या २० जानेवारी २०२५ रोजी ४६ स्थापना दिनाच्या निमित्ताने तीळ गूळ समारंभाचे आयोजन बँकेच्या मुख्य कार्यालयात जळगाव येथे संध्या. ५ ते ९ या वेळेत करण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष डॉ अतुल सरोदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती व संचालक मंडळ यांनी केले आहे.