
मलकापूर दि.३ मे २०२४ :लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये रावेर लोकसभा क्षेत्रसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्रपक्षाच्या संयुक्त “महायुती” च्या अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ फेरो ऑईलटेक प्रा.लि., एम.आय.डी.सी., मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले. तसेच यावेळी फेरो ऑईलटेक प्रा.लि., येथील नवीन टेक्नोलॉजी युक्त डी-लिंटर मशीनचे श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह माजी आमदार श्री.चैनसुख संचेती, श्री.शिवचंद्र तायडे, श्री.रामनिवास चंदुलाल बोहरा, श्री.मोहनजी शर्मा, श्री.डी.एस.चव्हाण सर, तालुकाध्यक्ष श्री.ज्ञानदेव वाघोदे ई. प्रमुख उपस्थितीत होते.





