महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ अमोलदादा,ए.टी.नाना यांच्यासह गावकऱ्यांचा मोठा सहभाग
समस्या जाणुन घेत सोडविण्याचे आश्वासन
जळगांव दि.८ मे २०२४ : जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ ७ मे रोजी उत्राण, तळई, निपाणे, आडगाव, अंतुर्ली, जवखेडा सिम येथे प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांचा मोठा सहभाग होता.
प्रचारा दरम्यान गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.यावेळी अमोलदादा चिमणराव पाटील, माजी खा. ए. टी. नाना पाटील, डॉ. संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वरभाऊ आमले, वासुदेव पाटील, एस. आर. पाटील, नरेंद्र पाटील, अनिल महाजन, नाना देमले, मच्छिन्द्र पाटील, उज्वलाताई पाटील, ज्ञानोआबा पाटील, ज्ञानेश्वर भाऊ कंखरे, नरेश ठाकरे, अनुपदादा पवार, ऋषिकेष पाटील, जितेंद्र चौधरी, दगडू आण्णा चौधरी, बाजीराव पांढरे, कमलेश पाटील, गौरव पाटील, मिलिंद मोरे, छोटू भाऊ क्षीरसागर, भूषण पाटील यांसोबत महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.