जळगांव जिल्हाशासकीय

अवैध वाळू उपसा संदर्भात प्रांताधिकाऱ्यांची थेट नदीपात्रात उतरून कारवाई

वडनगरीत महसूल विभागाची मोठी कारवाई

| लोकमाध्यम न्युज जळगांव | २४ फेब्रुवारी २०२६ : अवैध वाळू उपशाविरुद्ध प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले असून, जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी स्वतः नदीपात्रात उतरून अवैध वाळू उपसा उधळून लावत मोठी कारवाई केली आहे.जळगाव तालुक्यातील वडनगरी येथे आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

प्रांताधिकारी विनय गोसावी यांना वडनगरी परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी महसूल पथकाने सकाळपासूनच परिसरात पाळत ठेवली होती. संधी मिळताच प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार पथकासह थेट नदीपात्रात धाव घेतली. सुमारे ३ तास चाललेल्या या मोहिमेत वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री, जाळी आणि दोरखंड शोधून काढून नष्ट करण्यात आले.या मोहिमेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासोबत मंडळ अधिकारी छाया कोळी, ग्राम महसूल अधिकारी श्री.बडगुजर, महसूल सहाय्यक तेजस सपकाळे, वडनगरीचे पोलीस पाटील व स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कारवाई दरम्यान जप्त केलेली सर्व यंत्रसामग्री प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या शासकीय वाहनातून जळगाव येथील प्रशासकीय इमारतीत जमा केली आहे. तसेच, गावातील तरुण आणि पोलीस पाटील यांना अवैध वाहतुकीवर लक्ष ठेवण्याच्या व संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button