शासकीय
दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते माल्यार्पण
जळगाव, दि. 20 : आद्य मराठी पत्रकार ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार (महसूल) गुजांळ मॅडम, तहसिलदार विजय बनसोडे , यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000