जळगावशासकीय

जिल्ह्यातील १५ व्या वित्त आयोग अनुदान खर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

कोणतेही काम नियमबाह्य होणार नाही हे कटाक्षानी पाळण्याचे आदेश

जळगाव दि. १ मार्च : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांसाठी मिळालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतीकडून विकास कामासाठी झालेला खर्च याचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी  अंकित यांनी घेतला.
ग्रामपंचायतींच्या तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी सर्व आवश्यक सहकार्य करणे आणि तांत्रिक मंजुरी आणि कामाच्या मोजमाप बुक नोंदीसाठी अभियंते दिले आहेत. अधिक जलद गतीने कामं व्हावीत यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना देण्यात आल्या तसेच राहिलेल्या कामांचे पुढील आठ दिवसात तांत्रिकबाबी पूर्ण करून कामे सुरु करावीत.आदेश देऊन कामे सुरू करण्याबाबत कार्यवाही करा. हे काम करतांना कोणतेही नियमबाह्य काम होणार नाही हे कटाक्षानी पाळण्याचे आदेशही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
शून्य खर्च असलेल्या ग्रामपंचायतीच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या. ग्रामपंचायती साठी खरेदी करतांना जेम प्रणालीचा वापर करावा तसेच सरपंच व ग्रामसेवक यांनी जेम वर नोंदणी करून घ्यावी असे सांगण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button